बचेंगे तो और भी लढेंगे : अर्थ आणि अन्वयार्थ

0

दत्ताजी शिंदेच्या इतिहास प्रसिद्ध “बचेंगे तो और भी लढेंगे” या वाक्यातुन काय शिकावे ?

१० जानेवारी १७६० रोजीची संक्रांत ! सकाळी सकाळी मराठ्यांचा महान सरदार दत्ताजी शिंदे बाहेर पडले. यमुना नदीच्या काठी असणाऱ्या बुराडी घाटाजवळ अफगाण व मराठा सैन्यात संघर्ष सुरु झाला. मातब्बर सरदार दत्ताजी शिंदे हे मराठ्यांचे तर नजिबखान रोहिला हा अफगाणी सैन्याचं प्रतिनिधित्व करत होता.

बुराडी घाटावर भीषण रणतांडव सुरु होतं. दोन्हीकडची बरीच माणसं मारली गेली. शेकडो लोक जखमी झाले. या रणतांडवात दंडाला गोळी लागुन दत्ताजी शिंदे जखमी झाले आणि घोड्यावरुन खाली पडले. तशाच जखमी अवस्थेत दत्ताजी शिंदे यांना पकडण्यात आले.

नजीबखान रोहिला व कुतुबशहा हत्तीवर बसुन जखमी दत्ताजी जवळ आले. दत्ताssssss… अशी कुत्सितपणे हाक मारुन कुतुबशहा म्हणाला,
क्यों पटेल ? हमसे और लढोंगे ?”

दत्ताजींनी कुतुबशहाच्या डोळ्यात डोळे घालुन तितक्याच बाणेदारपणे उत्तर दिले,
क्यों नही ? बचेंगे तो और भी लढेंगे !”7

दत्ताजी शिंदे

हे वाक्य देशाच्या इतिहासात प्रसिद्ध झाले. या वाक्यातच मराठ्यांच्या लढाऊ वृत्तीचे दर्शन घडते. या वाक्याने मराठ्यांना नवी चेतना दिली. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी प्रेरणादायी कार्यक्रमांमध्ये अनेक चांगली वाक्ये ऐकली असतील. पण सकारात्मक विचारांचं एक उत्तम उदाहरण म्हणजे दत्ताजींचं हे वाक्य “बचेंगे तो और भी लढेंगे !

दत्ताजी शिंदेच्या इतिहासप्रसिद्ध “बचेंगे तो और भी लढेंगे” या वाक्यातुन काय शिकावे ?

माणसाच्या आयुष्यात जरा कुठं काही घडलं की माणसं तणावाखाली जातात. नोकरी, व्यवसाय, प्रेम, नातेसंबध, कुटुंब, इत्यादि. क्षेत्रात रोज अनेक अनुभव येतात. त्याठिकाणी आलेला ताण घालविण्यासाठी काही माणसं नशेच्या आहारी जातात. काहीजण वाईट संगतीला लागुन बिघडतात. चुकीचे निर्णय घेऊन आणखी संकटात सापडतात. सगळ्यांना वाटतं ही माझ्या एकट्याच्याच वाट्याला सर्वाधिक दुःख, ताण आलेले आहेत. पण हा सगळा माणसाच्या मनाचा गैरसमज असतो. ताण वगैरे सगळ्या अंधश्रद्धा आहेत.

आपल्या मनातसुद्धा एक दत्ताजी राहत असतो. तो नेहमी सांगत असतो
“तु लढ ! माघार घेऊ नकोस ! संधी मिळेल तिथं लढत रहा ! लढला तरच जिंकशील ! प्रयत्न करता करता हरला तरी दुःख मानु नकोस, कारण पराभवाच्या भीतीने लढायला घाबरणाऱ्यांची इतिहास कधीच दखल घेत नाही.”

लढता लढता हरलो जरी हरल्याची मला खंत नाही
लढा माझा मातीसाठीच माझ्या लढाईला अंत नाही !

दत्ताजी शिंदे यांच्या पराक्रमाच्या अखंड परंपरेला मानाचा मुजरा !

© लोकराज्य टीम.

Leave A Reply