तंजावरचे मराठा

0

तंजावरच्या भोसले राजे घराण्याविषयी अपरिचीत माहिती सर्वांनी वाचा.

१) छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र बंधु व्यंकोजीराजांना १६७५ मध्ये आदिलशहाने तंजावरमध्ये राज्य करणाऱ्या त्रिची येथील नायकाला धडा शिकविण्यासाठी पाठविले होते. व्यंकोजीराजांनी त्रिचीच्या नायकाला खाली खेचुन आदिलशहाच्या मृत्युनंतर स्वतःला राजे घोषित केले.

२) दक्षिण दिग्विजयावेळी महाराजांनी तंजावरचे राज्य व्यंकोजींना परत केले आणि चांगले संबंध प्रस्थापित केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे सख्खे सावत्र भाऊ व्यंकोजी राजे हे तंजावरचे पहिले मराठा राजे होते.

३) चेन्नई जवळच्या जिंजीचा किल्ला हा मराठा साम्राज्याचा भाग होता. तंजावरच्या राजांनी कावेरी खोऱ्याच्या आजुबाजुच्या प्रदेशावर राज्य केले.

४) तंजावरचे मराठा साम्राज्य एकूण १८० वर्षे टिकुन होते. या १८० वर्षात एकुण १० राजे होऊन गेले.

मराठा पॅलेस, तंजावर (१७७८)

५) सन १८३२ मध्ये तिसरे शिवाजी महाराज यांची सत्ता ब्रिटिशांनी बरखास्त केली. हे तंजावरचे शेवटचे मराठा राजे होय.

६) तंजावरच्या मराठा राजवटीतील सर्वात शुर व विद्वान राजा म्हणजे पहिले “सरफोजीराजे” होय. ते स्वतः उत्तम वैद्य व डोळ्यांचे डॉक्टर होते.

७) तंजावरचे मराठा साम्राज्य विद्वत्ता व कला संपन्न होते. तेथील मराठा राजांनी ५० हुन अधिक विविध विविध ग्रंथ लिहिले असुन त्यात १२ दर्जेदार नाटके आहेत. यातीलच एक मराठी नाटक रंगमंचावर तंजावर येथे सादर केले गेले, ते रंगमंचावरील पहिले मराठी नाटक होय.

८) राजा चोळ याने बांधलेल्या बृहदेश्वर राजराजेश्वर मंदिराच्या भींतीवर मराठा राजांनी मराठा साम्राज्याचा जगातील सर्वात मोठा मराठी शिलालेख कोरला आहे.

९) भारतातील पहिला छापखाना राजे सरफोजी यांनी तंजावर येथे सुरु केला.

१०) कवी परमानंद यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार लिहिण्यास सुरुवात केलेला “शिवचरित्र” ह्या मुळ ग्रंथाची अस्सल प्रत येथे आजही आहे.

११) भारतातील मुलींची पहिली शाळा राजे सरफोजी यांनी तंजावर येथे काढली.

१२) मराठा राजांनी भरतनाट्यम या नृत्याला राजाश्रय दिला होता.

१३) मराठा राजांनी मराठी सण, उत्सव, व्रत, कला ई. तंजावर मध्ये रुजविले. तसेच सरफोजीराजे यांनी भव्य “सरस्वती महाल” हे ग्रंथालय उभारले आहे. त्यात युध्दशास्त्रापासुन वैद्यकशास्त्रापर्यंत पशु, पक्षी, आरोग्य, अर्थ, कला, ज्यातिषशास्त्र, वास्तुशास्त्र, बांधकामशास्त्र ईत्यादी १७ विषयावर हजारो ग्रंथ येथे जतन केलेले आहेत. एकुण ग्रंथसंपदा ३ लक्ष एवढी आहे.

१४) सरस्वती महाल ग्रंथालयात सुमारे ८० हजार ग्रंथ व हस्तलिखिते आहेत.  त्यात संस्कृतमधील ४० हजार हस्तलिखिते आहेत, तसेच अनेक तामिळ, तेलगु, मोडी, देवनागरी भाषेतील ग्रंथ आहेत.

१५) मोडी लिपीतील अडीच लाखांपेक्षा जास्त हस्तलिखितांचे ८५० गठ्ठे जतन करुन ठेवले आहेत.

१६) सरफोजीराजेंनी त्याकाळी लंडन, पॅरिस सारख्या शहरात चित्रकार पाठवुन त्या शहरांची चित्रे काढुन घेतली ती इथे पहायला मिळतात.

१७) तंजावरच्या या ग्रंथालयात एक ग्रंथ असा विस्मयचकित करणारा आहे, त्याच्या ओळी उजवीकडुन वाचल्या तर “रामायण”, डावीकडून वाचल्या तर “महाभारत” आणि वरुन खाली वाचल्या तर “श्रीमदभागवत” आहे.

१८) ताडाच्या, पामच्या झाडाच्या पानावर लिहिलेले पुरातन ज्योतिष शास्त्र व इतर ग्रंथ तंजावरच्या मराठा राजांनीच जतन करुन ठेवलेले आहेत.

१९) तंजावरच्या भोसले संस्थानने सन १९६२ च्या चीन युद्धाच्या वेळी २००० किलो सोने भारत सरकारला मदत म्हणुन दिले होते.

२०) १९७१ च्या पाकिस्तान युद्धात भारत सरकारला मदत म्हणुन शस्त्रास्त्रे दिली होती.

२१) विनोबा भावे यांच्या भुदान चळवळीला १०० एकर जमीन दान दिली होती.

२२) तंजावरमध्ये आजही सुमारे 5 लक्ष मराठी लोक राहतात, ते तामिळी पेहराव घालत असले तरी त्यांच्या घरात तोडकी मोडकी का होईना मराठीच बोलली जाते.

२३) सातारा, कोल्हापुर प्रमाणे आजही तंजावर येथे भोसले संस्थानिक आहेत.

२४) तिथले विद्यमान छत्रपती बाबाजीराजे भोसले हे आहेत. बाबाजीराजे स्वतः इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर असुन त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे.

२५) १ मे २०१५ रोजी एबीपी माझा या वृत्तवाहिनीने तंजावरच्या मराठा साम्राज्यवार एक स्पेशल रिपोर्ट देखील बनवला होता.

मराठ्यांच्या शोधात भाग १ – पानिपतचा रोड मराठा

संकलन – लोकराज्य टीम.

Leave A Reply